esakal | रुपाली चाकणकर यांना शुर्पणखा संबोधलेलं नाही - चित्रा वाघ
sakal

बोलून बातमी शोधा

Chitra Wagh

रुपाली चाकणकर यांना शूर्पणखा संबोधलेलं नाही - चित्रा वाघ

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : मी रुपाली चाकणकर यांना शूर्पणखा संबोधलेलं नाही, असं स्पष्टीकरण भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिलं आहे. वाघ यांच्या ट्विटमुळं मोठी खळबळ माजली होती. यावर वाघ यांच्यावर टीका व्हायला लागल्यानंतर त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

चित्रा वाघ म्हणाल्या, "राज्यात महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झालेली आहे. राजकीय रावणही राज्यात फिरत आहेत. विशेषतः सत्ताधारी पक्षातील आमदार, मंत्री आणि त्यांचे बगलबच्चे असतील त्यांच्यावर कित्येक केसेस पेंडिंग आहेत. त्यामुळे अशा रावणांना वाचवणाऱ्या शूर्पणखा महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नकोत असं मी म्हटलंय, मी कोणाचंही नाव घेतलेलं नाही. येणाऱ्या दिवसांत कोणीही त्या पदावर बसू देत जे बसतील त्यांचं स्वागत आहे. आम्ही यासाठी लढा पुकारला, वारंवार आंदोलनं केली.

राज्य महिला आयोगावर कोणाचं नाव घोषीत झालेलं मी ऐकलेलं नाही. त्या पदावर कोण व्यक्ती येतंय हे महत्वाचं नाही. तर त्या पदावर आलेल्या व्यक्तीनं त्या पदाला न्याय देणं गरजेचं आहे. नवरात्रीच्या उत्सवात देखील महिलांवरील अत्याचार कुठेही थांबलेले दिसत नाहीत. त्यामुळं हा राज्यातील प्रत्येक महिलेच्या मनातील आक्रोश आहे आणि तो मी व्यक्त केलेला आहे. त्यामुळं मला असं वाटतं की, दिवसाढवळ्या रावण फिरत आहेत, असे किती रावण मी तुम्हाला सांगू. या रावणांना वाचवणारी शुर्पणखा तुम्ही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी तुम्ही बसवू नका असं मी म्हटलं. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटलं की, मी जे ट्विट केलंय ते कोणाला उद्देशून केलेलं नाही. पण माध्यमांनी मी चाकणकर बाईंना उद्देशून म्हटल्याच्या बातम्या चालवल्या. त्या शूर्पणखा थोडीच आहेत. त्याचं नाव घोषीत झालेलं नसताना तुम्ही त्यांना कसं जाऊन विचारलं? महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची गरीमा मला माहिती आहे. ते कुठल्या पक्षाचं पद नाही तर संविधानिक पद आहे, त्यामुळे त्याचा आदर आहे, असंही यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या.

loading image
go to top