पंतप्रधान मोदींच्या सभेत सगळे बोलले पण खडसे... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना बोलू दिले गेले नाही. खडसेंना मोदींच्या सभेत बोलू न दिल्याने हा एक चर्चेचा मुद्दा ठरला आहे.

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दौरा केला. पंतप्रधान मोदींच्या विजय संकल्प सभेत भाजपचे नेतेमंडळींची भाषणं झाली. मात्र, राज्याचे माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना बोलू दिले गेले नाही. खडसेंना मोदींच्या सभेत बोलू न दिल्याने हा एक चर्चेचा मुद्दा ठरला आहे.

नाशिक येथील सभेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी केंद्रीय मंत्री डॉ सुभाष भामरे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांसारख्या नेत्यांची भाषणे झाली. त्यांची भाषणे होत असताना एकनाथ खडसे यांना कधी संधी मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, एकनाथ खडसे यांच्या भाषणाविनाच पंतप्रधान मोदींची सभा आटोपण्यात आली. त्यामुळे आता खडसे पुन्हा एकदा नाराज झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

हमे नया कश्मीर बनाना है; मोदींचा नवा नारा; पुन्हा आणूया आपले सरकार

'पुन्हा आपले सरकार'

जम्मू-काश्मीरबाबत आम्ही आश्वासन दिले होते आणि त्यानुसार आम्ही निर्णय घेतला. 'काश्मीर हमारा है', असे आपण म्हणत होते, आता आपण कश्मीर हमे फिरसे बनाना आहे, कश्मीर के नागरिक को गले लगाना है, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. चला पुन्हा आणूया आपले सरकार, असे म्हणत मोदींनी फडणवीस सरकारच्या कामाचे कौतुक केले.

पवारसाहेब तुमची मानसिकताच तसली’; मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Not given chance to Eknath Khadse for Speech in Nashik Maharashtra Vidhan Sabha