प्रसिद्ध चित्रकार दिलीप बडे यांचे औरंगाबादेत हृदयविकाराने निधन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज व बाळासाहेब ठाकरे आदींची पोट्रेट त्यांनी सर्वाधिक काढलेली आहेत.
Painter Dilip Bade
Painter Dilip Bade esakal
Updated on: 

औरंगाबाद : प्रसिद्ध चित्रकार दिलीप धोंडीराम बडे (वय 68) यांचे आज रविवारी (ता.सहा) पहाटे एक वाजेच्या सुमारास ह्रदयविकाराने औरंगाबादमध्ये निधन झाले. ते मूळचे अंबाजोगाई येथील होते. जे जे. स्कूल ऑफ आर्ट ( J.J. School Of Art), मुंबई इथून त्यांचे शिक्षण झाले होते व तिथेच प्राध्यापक म्हणून नोकरीत रूजू झाले. औरंगाबाद (Aurangabad) येथील गव्हर्नमेंट स्कूल ऑफ फाईन आर्टचे डीन या पदावरून ते निवृत्त झाले होते. 'पोट्रेट मास्टर' अशी त्यांची ओळख आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज व बाळासाहेब ठाकरे आदींची पोट्रेट त्यांनी सर्वाधिक काढलेली आहेत. (Noted Painter Dilip Bade Died Due To Heart Attack In Aurangabad)

Painter Dilip Bade
भारतरत्न लता मंगेशकर कालवश, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

त्यांनी रेखाटलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पोट्रेट विधान भवनामध्ये लावण्यात आलेली आहे. या शिवाय औरंगाबाद महापालिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी देखील त्यांनी रेखाटलेले पोट्रेट लावण्यात आलेले आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. दिवंगत दिलीप बडे (Painter Dilip Bade) यांच्यावर आज दुपारी एक वाजता छावणी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com