

गॅस
सोलापूर : इराण-इस्राईलमधील युद्धाचा परिणाम थेट गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर झाला आहे. युद्धामुळे होणारी गॅसची आयात प्रभावित झाली आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या गॅसचे तीनही कंपन्यांकडून नियोजन करण्यात आले आहे. आता पहिला घरगुती गॅस सिलिंडर मिळाल्यानंतर दुसऱ्या सिलिंडरचे बुकिंग करण्यासाठी २५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरचे वाटप काटकसरीने करावे लागणार आहे.
पहिल्या गॅस सिलिंडरची डिलिव्हरी झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सिलिंडर बुकिंग करता येणार नाही. मोबाईलवरून बुकिंग करण्याचा प्रयत्न केल्यास ते स्वीकारले जाणार नाही. उलट कंपनीकडून २५ दिवसांनंतर बुकिंग करण्याचा मेसेज येणार आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेला गॅस सिलिंडर २५ दिवस काटकसरीने वापरावा लागणार आहे. कंपन्यांकडून घरगुती गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले जात असून कमर्शिअल (व्यावसायिक) गॅस सिलिंडरचा पुरवठा सध्या कमी होण्याची शक्यता आहे.
कंपन्यांनी हा निर्णय का घेतला?
दुसरा घरगुती सिलिंडर बुकिंग करण्यासाठी २५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. साधारणपणे ४ ते ५ सदस्यांच्या कुटुंबासाठी एक गॅस सिलिंडर सुमारे ३० दिवस वापरात येतो. काही जण पहिला सिलिंडर वापरात असतानाच दुसरा सिलिंडर बुक करतात. मात्र आता हा पर्याय बंद करण्यात आला आहे. भारत गॅस आणि हिंदुस्थान गॅस कंपनीने २५ दिवसांचा, तर इंडियन ऑइल कंपनीने ३० दिवसांचा कालावधी निश्चित केला आहे.
कंपन्यांनी सॉफ्टवेअरमध्ये केला बदल
घरगुती गॅस सिलिंडरची सध्या कोणतीही टंचाई नाही. मात्र उपलब्ध असलेल्या सिलिंडरची कमतरता भासू नये, यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे. सध्या सिलिंडर बुकिंग केल्यानंतर ४८ तासांच्या आत गॅस सिलिंडर उपलब्ध होतो. मात्र आधीसारखे दुसऱ्या सिलिंडरचे बुकिंग लगेच करता येणार नाही. २५ दिवसांनंतरच दुसरा गॅस सिलिंडर बुक करावा लागणार आहे. कंपन्यांनी सॉफ्टवेअरमध्ये त्यानुसार बदल केले आहेत.
- सागर भोमाज, सागर गॅस एजन्सी, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.