"मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे आहेत तुम्ही नाही..."; मलिकांचा फडणवीसांना टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nawab Malik-Devendra Fadnavis
"मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे आहेत तुम्ही नाही..."; मलिकांचा फडणवीसांना टोला

"मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे आहेत तुम्ही नाही..."; मलिकांचा फडणवीसांना टोला

मुंबई : भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे आहेत तुम्ही नाही..."अशा शब्दांत मलिकांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

मलिक यांनी ट्विट करुन फडणवीस यांना सुनावलं आहे. यामध्ये ते म्हणतात, "देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री मानायला तयार नाहीत कारण ते आत्ताही स्वतःलाच मुख्यमंत्री मानत आहेत. देवेंद्रजी, उघडा डोळे बघा नीट... स्वप्नं बघायचं आता बंद करा. मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे आहेत तुम्ही नाही"

भाजपच्या बैठकीत काय म्हणाले होते फडणवीस?

उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानं त्यांची प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी शुभेच्छा दिल्या. पण लगेचच त्यांच्यावर टीकाही केली. त्यांनी म्हटलं, "महाराष्ट्र सर्वांत प्रगतीशील राज्य असताना आज सरकार कुठेय, हा प्रश्न विचारावा लागतो आहे. एक मुख्यमंत्री आहेत, ज्यांना कोण मुख्यमंत्री समजत नाही. प्रत्येक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजतो आणि महाराष्ट्रातील जनता आता बेजार आहे. कुणी राज्य म्हणून जनतेचा विचार करत नाही, समस्यांचा विचार करत नाही"

सध्या प्रत्येक विभागात 'वाझे' आहे

भाजपच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना फडणवीस पुढे म्हणाले, "पाच वर्षे आपलं सरकार होतं. आपल्या सरकारच्या काळात कशावर चर्चा व्हायची? समृद्धी महामार्ग, मेट्रो, जलयुक्त शिवार, डिजीटल इंडिया, उद्योगीकरण. मात्र, आज यातील कुठल्याच गोष्टीवर चर्चा होत नाही. आता गांजा नव्हे तर हर्बल तंबाखूवर चर्चा होते. दंगली, खंडणी, वसूली यावर चर्चा होते. या सरकारच्या काळातील अनाचार दुराचार इतका आहे की महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत भ्रष्ट सरकार म्हणून इतिहासात नोंद होईल. राज्यात ज्याप्रकारे वसूली सुरु आहे की, माजी गृहमंत्री तुरुंगात असताना देखील प्रत्येक विभागात एक 'वाझे' आहे. सरकार सामान्यांसाठी नसून कायद्याचं राज्य नसून 'काय ते द्या'चं सध्या राज्य आहे"

loading image
go to top