esakal | video : आता शेती करण्याचा विचार - इंदोरीकर
sakal

बोलून बातमी शोधा

nivrutti-maharaj-indurikar

‘आता माझी क्षमता संपली आहे. आता एक-दोन कार्यक्रमांनंतर कार्यक्रम करायचे नाहीत, असे मी ठरविले आहे,’ असे सांगत यापुढे कीर्तन करणे थांबवत शेती करण्याचा विचार असल्याचे सूतोवाच निवृत्ती देशमुख महाराज (इंदोरीकर) यांनी आज भिंगार येथे केले.

video : आता शेती करण्याचा विचार - इंदोरीकर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नगर - ‘आता माझी क्षमता संपली आहे. आता एक-दोन कार्यक्रमांनंतर कार्यक्रम करायचे नाहीत, असे मी ठरविले आहे,’ असे सांगत यापुढे कीर्तन करणे थांबवत शेती करण्याचा विचार असल्याचे सूतोवाच निवृत्ती देशमुख महाराज (इंदोरीकर) यांनी आज भिंगार येथे केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शुक्‍लेश्‍वर मंदिरामध्ये आज खासगी सुरक्षारक्षकांच्या (बाउन्सर) गराड्यातच त्यांचे कीर्तन झाले. आयोजकांनी खबरदारी म्हणून महाराजांना सुरक्षा पुरविली होती.

कीर्तनामधील कथित वक्तव्यामुळे वादग्रस्त ठरलेले निवृत्ती महाराज देशमुख गेल्या काही दिवसांपासून राज्यभर चर्चेत आहेत. हा वाद थांबविण्याचे आवाहनही महाराज ठिकठिकाणी कीर्तनांच्या माध्यमातून करीत आहेत. मात्र, सोशल मीडियावर वाद अधिकच वाढत आहे.

इंदोरीकर म्हणाले, आता माझी क्षमता संपली आहे. मी चुकीचे बोललो नाही. ग्रंथाच्या आधारेच बोललो आहे. एक-दोन दिवस कार्यक्रम करायचे. त्यानंतर कार्यक्रम करायचे नाहीत, असे मी ठरविले आहे.’

loading image