देवेंद्र फडणवीसांची होणार 'बूस्टर डोस' सभा; शेलारांची घोषणा

महाराष्ट्र दिनी भाजपनं खास सांस्कृतीक कार्यक्रमाचं आयोजन केलं असून याच वेळी ही सभा होणार आहे.
Booster dose sabha | Devendra Fadnavis Rally
Booster dose sabha | Devendra Fadnavis Rally
Updated on

मुंबई : महाराष्ट्र दिनी १ मे रोजी भाजपच्यावतीनं सांस्कृतीक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून यावेळी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभाही होणार आहे. या सभेला भाजपनं 'बूस्टर डोस सभा' असं संबोधलं आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी तसेच शिवसेनेसह महाविकास आघाडीला उत्तर देण्यासाठी ही सभा असेल असं, भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. (Now Devendra Fadnavis will have a booster dose rally Ashish Shelar announcement)

Booster dose sabha | Devendra Fadnavis Rally
मग इतकी वर्षे का शांत होता? अजित पवारांचा शेलारांना सवाल

शेलार म्हणाले, "१ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त भाजपच्यावतीनं रंगारंग उच्चप्रतीच्या सांस्कृतीक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. खरतरं कोरोनानंतर केवळ भाजपनचं एवढा मोठा आणि रंगानं भरलेला मुंबईकरांची संस्कृती सांगणाऱ्या सोहळ्याचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमात मुंबईतील शक्ती केंद्र प्रमुख आणि बुथ प्रमुखां रुपानं हजारो कार्यकर्ते मुंबईतील सोमय्या ग्राऊंडवर उत्साहात आणि आनंदात सहभागी होणार आहेत"

Booster dose sabha | Devendra Fadnavis Rally
''मी देशाची पंतप्रधान होऊ शकते, पण...'', मायावतींनी व्यक्त केली इच्छा

त्याचबरोबर या सोहळ्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बूस्टर डोस सभा होणार आहे. बूस्टर डोस सभा यासाठी की याद्वारे भाजपच्या कार्यकर्त्यांना 'बूस्टर' तर शिवसेनेसह महाराष्ट्र विकास आघाडीला 'डोस' देण्यात येणार आहे. कडकडीत डोस असलेल्या अशा तडाखेबंद भाषणाचा कार्यक्रम फडणवीसांच्या सभेनं संपूर्ण महाराष्ट्र अनुभवेल, असंही शेलार यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maratha Reservation Row Manoj Jarange Alleges Government Conspiracy To Distance Him From Community During Madha Rally
Heavy Rain Likely in Pune Ghats, Akola and Amravati
zp schools
certificate
Marathi News Esakal
www.esakal.com