मोठी बातमी! आता प्रत्येक शिक्षकाचे स्वतंत्र प्रोफाईल तयार होणार; माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय; एका क्लिकवर मिळणार ३ लाख शिक्षकांचा बायोडाटा

शालार्थ आयडीतील घोटाळा समोर आल्यानंतर भविष्यात असे गैरप्रकार घडू नयेत, यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने सावध पवित्रा घेतला आहे. राज्यातील सर्वच सुमारे १७ हजार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील प्रत्येक शिक्षकाचे स्वतंत्र प्रोफाईल तयार केले जाणार आहे.
zp schools
zp schoolssakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : शालार्थ आयडीतील घोटाळा समोर आल्यानंतर भविष्यात असे गैरप्रकार घडू नयेत, यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने सावध पवित्रा घेतला आहे. राज्यातील सर्वच सुमारे १७ हजार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील प्रत्येक शिक्षकाचे स्वतंत्र प्रोफाईल तयार केले जाणार आहे. त्यात या शाळांवरील सुमारे तीन लाख शिक्षकांची संपूर्ण माहिती समाविष्ट केली जाणार आहे.

नागपूरमध्ये बनावट शालार्थ आयडीचे धक्कादायक प्रकार समोर आले. त्यानंतर राज्यातील सर्वच खासगी माध्यमिक शाळांमधील सुमारे तीन लाख शिक्षकांच्या कागदपत्रांच्या पडताळणीचा निर्णय झाला. शालार्थ आयडीतील घोटाळा शोधण्यासाठी राज्य शासनाने ‘एसआटी’ स्थापन केली आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करीत आहे. समितीचा अहवाल मेअखेर राज्य शासनाला सादर होईल.

दुसरीकडे, माध्यमिक शिक्षण विभागाने आता आपल्या अखत्यारीतील सर्व शाळांमधील प्रत्येक शिक्षकाची माहिती एका क्लिकवर अधिकाऱ्यांना उपलब्ध व्हावी, यासाठी त्यांचे प्रोफाईल बनविण्याचा निर्णय घेतला. त्याची कार्यवाही काही दिवसांत सुरू होणार असून, शिक्षकाची संपूर्ण माहिती मुख्याध्यापक व संबंधित शिक्षकांकडून घेतली जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र पोर्टल तयार केले जाणार असून, त्यात शिक्षकांना माहिती भरण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. या माहितीचा वापर गुणवत्ता वाढीसाठी देखील होणार असून, प्रत्येक शाळेतील सर्व वर्गांमधील पटसंख्या देखील अधिकाऱ्यांना समजणार आहे.

शिक्षकांची असणार संपूर्ण माहिती

राज्यातील १७ हजार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील सुमारे तीन लाख शिक्षकांची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होईल, यादृष्टीने नियोजन सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक शिक्षकाचे स्वतंत्र प्रोफाईल तयार केले जाणार आहे. त्यात शिक्षकाची संपूर्ण माहिती असणार आहे.

- डॉ. श्रीराम पानझडे, सहसंचालक, माध्यमिक शिक्षण विभाग, पुणे

प्रोफाईलमध्ये असणार ‘या’ बाबी...

शिक्षकाचे नाव, त्यांची शाळा, शिकवत असलेला वर्ग, त्यातील विद्यार्थी संख्या, दरवर्षी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी (वार्षिक निकाल), अधिकाऱ्यांनी वर्गाला दिलेल्या भेटी, त्यांना निदर्शनास आलेल्या बाबी, शिक्षकाबद्दलची तक्रार, शिक्षकाने केलेल्या तक्रारी, त्याची सुनावणी तथा स्टेटस, न्यायालयीन प्रकरण आणि शैक्षणिक कागदपत्रे, अशी संपूर्ण माहिती त्या प्रोफाईलमध्ये असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com