Railway Update: आता मिरज ते कोल्हापूर प्रवास होणार सुसाट, प्रवाशांच्या मागणीला रेल्वेमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल!
Ashwini Vaishnav: पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या दिशेने केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी मध्य रेल्वे अंतर्गत रुपये १२८.७८ कोटी खर्चाच्या मिरज कॉर्ड लाईन प्रकल्पाला मान्यता दिली आहे.
मुंबई : केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि मालवाहतूक कार्यक्षमता वाढवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत, मध्य रेल्वे अंतर्गत रुपये १२८.७८ कोटी खर्चाच्या मिरज कॉर्ड लाईन (१.७३ किमी) प्रकल्पाला मान्यता दिली .