Nilesh Rane: "आता राजकरणात मन रमत नाही", दसऱ्या दिवशी निलेश राणे यांचा सक्रीय राजकारणाला जय महाराष्ट्र !

मी राजकारणातून कायमचा बाजूला होतोय, निलेश राणे यांचा मोठा निर्णय
Nilesh Rane
Nilesh RaneEsakal

माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

भाजप नेते निलेश राणे यांनी राजकारणातून बाहेर पडणार असल्याची घोषणा केली आहे. यासंबधीची पोस्ट त्यांनी त्यांच्या सोशल मिडीयावर शेअर केली आहे. आता राजकरणात मन रमत नाही, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

Nilesh Rane
RSS Dasara Melava Nagpur: "संस्कृती, परंपरा टिकवण्यासाठी RSS ने जेवढं केलं तेवढं कुणीही नाही!" शंकर महादेवन यांचे जोरदार भाषण

ट्विटरवर शेअर केली पोस्ट

नमस्कार,

मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या १९/२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे.

Nilesh Rane
Dasara Melava 1999: सोनिया गांधींची काँग्रेस आणि सेना एकत्र आली असती तर... आठवणी बाळासाहेबांच्या; दस्तावेज 'सकाळ'चे

मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही.

कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com