
आता राणा दाम्पत्याचे घर मुंबई महानगरपालिकेच्या रडारवर; हातोडा पडणार?
मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात राणा दाम्पत्य विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा संघर्ष पाहायला मिळत आहे. या संघर्षावर प्रत्येकजण आपापले मत व्यक्त करीत आहेत. कोणी राणांच्या बाजूने आहे तर कोणी मुख्यमंत्र्यांच्या बाजूने आहे. याच वादामुळे तब्बल १२ दिवस राणा दाम्पत्याला तुरुंगात काढावी लागली. त्यांना जामीन मिळाला असला तरी ग्रहण काही सुटलेले दिसत नाही. कारण, राणा दाम्पत्याचे मुंबई उपनगरातील घर मुंबई महानगरपालिकेच्या रडारवर आले आहे. (Now the Rana couples house is on the radar of the corporation)
राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा म्हणणार असल्याचे जाहीर केले होते. यामुळे चांगलाच वाद पाहायला मिळाला होता. याची गंभीर दखल घेत राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे त्यांना तब्बल १२ दिवस तुरुंगात राहावे लागले.
हेही वाचा: वारांगनांसाठी नवा कायदा लागू; या देशाने दिली मान्यता
याप्रकरणी राणा दाम्पत्याला काही दिवसांपूर्वीच जामीन मिळाला. मात्र, पत्रकारांसमोर पुन्हा मुख्यमंत्र्यांना आव्हान दिल्याने त्यांच्यावरील अटकेची टांगती तलवार कायम आहे. अशात सोमवारी (ता. १०) मुंबई पालिकेने राणा दाम्पत्याला महापालिका कायद्याच्या कलम ३५१ (१ए)च्या अंतर्गत (illegal construction) कारणे दाखवा नोटीस (Notice issued) पाठवली आहे. तसेच खारमधील घराची अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
आठव्या मजल्यावर अवैध बांधकाम
राणा दाम्पत्याचे निवासस्थान असलेल्या खारमधील घराच्या आठव्या मजल्यावर अवैध बांधकाम (illegal construction) केल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांना आढळून आले. त्यामुळे पालिकेकडून राणा दाम्पत्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसला सात दिवसांत उत्तर द्यावे लागणार आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांना ठोस कारण न दिल्यास अवैध बांधकामावर कारवाई करण्यात येईल.
Web Title: Now The Rana Couples House Is On The Radar Of The Corporation Notice Issued Illegal Construction
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..