NSTS चा निकाल जाहीर; ‘इस्रो’ सहलीसाठी राज्यातील ५४ विद्यार्थ्यांची निवड | NSTS Exam Result | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NSTS
NSTS चा निकाल जाहीर; ‘इस्रो’ सहलीसाठी राज्यातील ५४ विद्यार्थ्यांची निवड

NSTS चा निकाल जाहीर; ‘इस्रो’ सहलीसाठी राज्यातील ५४ विद्यार्थ्यांची निवड

जळगाव : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची रुची निर्माण व्हावी तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च तंत्रज्ञान व संशोधन संस्था बघता याव्यात यासाठी गेल्या वर्षी नोबेल फाउंडेशन (Nobel Foundation) द्वारा राज्यस्तरीय नोबेल सायन्स टॅलेंट सर्च (NSTS) परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेच्या मुलाखतीचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला असून, राज्यभरातील ५४ विद्यार्थ्यांची इस्रो, आयआयटी सहलीसाठी (IIT Tour) निवड करण्यात आली आहे.

राज्यभरातून ४२३० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी ६२० विद्यार्थ्यांची मुलाखतीसाठी निवड झालेली होती. यात पाचवी ते सातवी गटात कऱ्हाड येथील ओम आनंद कुत्ते प्रथम, तर इयत्ता आठवी ते दहावीच्या गटात पाचोरा येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलचा वैभव रामदास पाटील, मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूल अमळनेरचा दहावीतील विद्यार्थी मैत्रन्य महेश पाटील, अकरावी-बारावी गटात अनुराग व्यंकटेश मांडके राज्यात प्रथम आला. सविस्तर निकाल www.nobelfoundation.co.in या वेबसाइटवर पाहता येईल.

हेही वाचा: अखेर लसीकरण प्रमाणपत्रावरुन हटवला जाणार PM मोदींचा फोटो

यावर्षी नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा जून महिन्यात होणार असून अर्ज भरण्याची सुरुवात १२ जानेवारी पासून होणार आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना ‘नोबेल फाउंडेशन’चे संस्थापक जयदीप पाटील म्हणाले, ‘‘या परीक्षेमुळे खेड्यापाड्यांत विज्ञानमय वातावरण निर्माण होण्यास मदत होत आहे. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे स्वप्न पूर्ण करणारी युवा पिढी यातून निर्माण होईल.’’

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Day Maharashtraexam
loading image
go to top