राज्यात कोरोना बाधितांची संख्या साडे चार लाखावर; तर 'इतक्या' रुग्णांना डिस्चार्ज

मिलिंद तांबे
Monday, 3 August 2020

राज्यात आज ही दिवसभरात 8,968 रुग्णांची नोंद झाली. राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 4,50,196 झाली आहे.

मुंबई : राज्यात आज ही दिवसभरात 8,968 रुग्णांची नोंद झाली. राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 4,50,196 झाली आहे. तर आज दिवसभरात 10,221 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आज 266 मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा आकडा 15,842 वर पोहोचला आहे. राज्यात आज रोजी एकूण 1,47,018 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दर्या राजा मान ह्यो तुझा दरवर्षाचा... नारळीपुनवचा...घे सांभाळून घे लेकरांना...                       

आज 10,221 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात आतापर्यंत 2,87,030 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 63.76 % एवढे झाले आहे.आज राज्यात एकूण 266 मृत्यूंची नोंद झाली. त्यापैकी ठाणे परिमंडळ 83, पुणे मंडळ 66,नाशिक 19, औरंगाबाद मंडळ 4,कोल्हापूर 20, लातूर मंडळ 14,अकोला मंडळ 7 ,नागपूर 50 व बाहेच्या राज्यातील 3 मृत्यूचा समावेश आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.52 % एवढा आहे.   

राज्य सरकारकडून फेरीवाल्यांना मनाई कायम; व्यवसाय करण्यास परवानगी मिळणार नसल्याचे स्पष्ट

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 22,98,723 नमुन्यांपैकी 4,50,196 ( 19.58 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 9,40,486 लोक होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 37,009 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

---------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of corona cases in the state is over four and a half lakh