
Summary
अंतरवाली सराटीत ओबीसींचे उपोषण चौथ्या दिवशीही सुरू असून आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत मागण्या मान्य झाल्यानंतर आंदोलन मागे घेतले, तर ओबीसींचे उपोषण कायम आहे.
छगन भुजबळ यांनी ओबीसींना शांत राहून न्यायालयीन मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे.
मराठा आरक्षणाचा लढा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ज्या अंतरवाली सराटीमधून राज्यभरात पोहचवला, त्या अंतरवालीत ओबीसी समाजाने ओबीसी आरक्षण बचाव उपोषण आंदोलन सुरु केले असून उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. ५८ लाख कुणबी नोंदी रद्द करण्यात याव्यात अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे, दरम्यान बुधवारी उपोषणस्थळी सरकारने मनोज जरागेंच्या मागण्या मान्य केलेल्या जीआरची होळी करण्यात आली.