
laxman hake melava
esakal
OBC Melava: राज्य शासनाने मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बीड आणि परिसरात मेळावे आणि सभांचा धडाका लावला. दुसरीकडे बीडमध्ये छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी मेळवा नियोजित आहे. पावसामुळे हा मेळावा पुढे ढकलण्यात आलेला आहे. मात्र या कार्यक्रमासाठी लक्ष्मण हाके यांना डावलण्यात आलेलं आहे.