OBC Reservation News | OBC आरक्षणप्रकरणी भाजपा पुन्हा आक्रमक होणार? बैठकीत ठरणार रणनीती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

OBC Reservation News
OBC आरक्षणप्रकरणी भाजपा पुन्हा आक्रमक होणार? बैठकीत ठरणार रणनीती

OBC आरक्षणप्रकरणी भाजपा पुन्हा आक्रमक होणार? बैठकीत ठरणार रणनीती

OBC Reservation: ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काल यासंदर्भात महाविकास आघाडीची एक बैठक पार पडली आहे. तर आता भाजपा नेतेही याविषयी बैठक घेणार आहे. भाजपाच्या ओबीसी मोर्चाची बैठक उद्या होणार आहे.

ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर आता पुढची भूमिका काय असेल यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. ओबीसी मोर्चाचे प्रभारी संजय कुटे, योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वात ही बैठक होणार आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील हेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

दादरच्या वसंतस्मृती या कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यावर आता पुढची दिशा काय असेल, हे आरक्षण नक्की कोणामुळे रद्द झालं, जनजागृती कशी करायची याविषयीची दिशा ठरवली जाणार आहे. जिथे ओबीसी आरक्षण(OBC Reservation) रद्द झालंय तिथे ओबीसी उमेदवारच देणार ही भूमिका प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी मांडली होती. त्यामुळे याबद्दल आणि महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आता काय भूमिका याविषयी बैठकीत चर्चा होणार आहे.

हेही वाचा: चंद्रकांत पाटलांनाच सरकारने राज्याचे वकील म्हणून उभं करावं- शिवसेना

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाविषयी राज्य सरकारला मोठा दणका दिला आहे. राज्य सरकारने केलेला कायदा फेटाळून लावत १५ दिवसांमध्ये ओबीसी आरक्षणाविनाच निवडणुका जाहीर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे. सध्या जवळपास १४ महानगरपालिका आणि जवळपास २५ जिल्हा परिषदांसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सध्या रखडल्या आहेत. या निवडणुका २०२० च्या जुन्या प्रभागरचनेनुसारच घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. (BJP holds a meeting on OBC reservation)

Web Title: Obc Reservation Bjp Leader Meeting Supreme Court Mahavikas Aghadi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top