
OBC Reservation
Sakal
नागपूर : राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी काढलेल्या पहिल्या शासन निर्णयात ‘पात्र’ असा शब्द वापरला होता. नंतर दुसरा शासन निर्णय काढून हा शब्द वगळण्यात आला. याचा अर्थ मराठा समाजाला ओबीसींमधून सरसकट आरक्षण देणार असा होतो. हा मूळ ओबीसी समाजावर अन्याय आहे. याविरोधात लढा देण्यासाठी २५ प्रमुख लोकांची एक समिती स्थापन केली आहे. ऑक्टोबरमध्ये नागपुरात ओबीसींचा महामोर्चा निघेल, अशी माहिती ओबीसी नेते आणि काँग्रेसचे विधानसभेतील पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.