शरद पवारांबद्दल पुन्हा आक्षेपार्ह पोस्ट! आव्हाडांचं फडणवीसांना 'हे' आवाहन

जितेंद्र आव्हाड यांनी पोलीस महासंचालकांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
शरद पवारांबद्दल पुन्हा आक्षेपार्ह पोस्ट! आव्हाडांचं फडणवीसांना 'हे' आवाहन

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा आणि राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटद्वारे त्यांनी पोलीस महासंचालक आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचं आवाहन केलं आहे. (Offensive post about Sharad Pawar Jitendra Ahwada appeal Devendra Fadnavis to take action)

आव्हाड यांनी एका बातमीचा स्क्रिनशॉट शेअर केला असून यामध्ये बातमीवरील लाईव्ह चॅट सेक्शनमध्ये RSS! संघराज नावाच्या अकाऊंटवरुन शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दांत टिपण्णी करण्यात आली आहे. या आकाऊंटवरुन सलग चार कमेंट करण्यात आल्या असून त्यामध्ये शरद पवार, बाबासाहेब पुरंदरे, श्रीमंत कोकाटे, शिवाजी महाराज, जिजामाता, दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

शरद पवारांबद्दल पुन्हा आक्षेपार्ह पोस्ट! आव्हाडांचं फडणवीसांना 'हे' आवाहन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वर्ल्ड रेकॉर्ड; फडणवीसांनी केलं अभिनंदन

आव्हाडांनी या चॅटचा स्क्रिनशॉट आपल्या ट्विटरवरुन शेअर करत याची नोंद पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस यांनी घ्यावी तसेच हे अकाऊंट कोणाचं आहे याची माहिती घ्यावी आणि कारवाई करावी, असं आवाहन करत देवेंद्र फडणवीस यांना देखील टॅग केलं आहे.

शरद पवारांबद्दल पुन्हा आक्षेपार्ह पोस्ट! आव्हाडांचं फडणवीसांना 'हे' आवाहन
Mukesh Ambani Antilia News: हे पाहा मुकेश अंबानी यांना आलेलं धमकीचं पत्र

यापूर्वी अभिनेत्री केतकी चितळे हीनं देखील अशाच प्रकारे शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. यानंतर तिच्यावर महाराष्ट्रात विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले होते. तसेच तिला काही काळ तुरुंगवासही भोगावा लागला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com