esakal | Mukesh Ambani Antilia News: हे पाहा मुकेश अंबानी यांना आलेलं धमकीचं पत्र

बोलून बातमी शोधा

Mukesh Ambani Antilia News: हे पाहा मुकेश अंबानी यांना आलेलं धमकीचं पत्र}

मुकेश अंबानी यांना धमकीचं पत्र देखील आलं आहे. पोलिसांनी हे पत्र आपल्या ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु करण्यात आला आहे.

mumbai
Mukesh Ambani Antilia News: हे पाहा मुकेश अंबानी यांना आलेलं धमकीचं पत्र
sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबई:  रिलायन्स ग्रुपचे प्रमुख उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या जवळ मिळून आलेल्या संशयास्पद गाडीमध्ये वीस जिलेटिनच्या कांड्या सापडल्या. त्यानंतर मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाय या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील गांभीर्याने चौकशी करून संबंधित प्रकरणात लवकरात लवकर कारवाई करण्यासंदर्भात चर्चा केली असल्याची माहिती माहिती मिळत आहे. दरम्यान या सोबत मुकेश अंबानी यांना धमकीचं पत्र देखील आलं आहे. पोलिसांनी हे पत्र आपल्या ताब्यात घेतलं आहे. 

मुकेश अंबानी यांना आलेलं धमकीचं पत्र जशाच्या तसं

ये तो सिर्फ ट्रेलर है

निता भाभी मुकेश भैया...फॅमिली येतो झलक है! 
अअगली बार ये सामान पुरा हो क्या आयेगा तुम्हारे पुरेसा मे लिखो उडाने के लिए . इंतजाम हो गया है!

संभल जाना

जप्त केलेल्या गाडीतून सुपर पावर डेझर एक्सप्लोजिव २५ एम एम * १२५ ग्रँम आणि 
सोलर इंडस्ट्रीज लिमिटेडच्या डो बाजारगाव नागपूर असे लिहिलेल्या १९ कांड्या तसंच 
बनावट नंबर प्लेट मिळाल्या आहेत.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांच्या कार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू करण्यात आला आहे.  गुन्हे शाखेकडून एकूण 8 ते 10 पथक तयार करण्यात आली असून त्यांच्याकडून तपास करण्यात येणार अशी माहिती समोर आली आहे.

स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळल्याने मुंबईतील सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. रात्री दहशतवादी विरोधी पथकही घटनास्थळी आले होते आणि सीसीटीव्ही ज्या दुकानातून मिळाला तिथून हार्डडिस्क ताब्यात घेण्यात आली आहे. मुंबई पोलिसांची क्विक रिस्पॉन्स टीमही अंबानींच्या बंगल्याबाहेर तैनात करण्यात आली आहे.

Mukesh Ambani house Antilia threat letter found FIR registered