esakal | सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : राज्याचे अर्थमंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राष्ट्रीय स्वयंवसेवक संघ यांच्याविरोधात समाज माध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याचे प्रकरण पुढे आहे. या प्रकरणात ओबीसी नेते बळीराजा धोटे यांना रविवारी (ता. 25) पहाटे पोलिसांनी अटक केली. त्यांच्या अटकेची माहिती कळताच भाजप वगळता सर्वपक्षीय नेते त्यांच्या समर्थनार्थ उतरले. या अटकेच्या निषेधार्थ पुढील रणनीती ठरविण्यासाठी धोटे समर्धकांनी एका बैठकीचे आयोजन केले आहे. दुसरीकडे, भाजप कार्यकर्त्यानी धोटे यांचा पुतळा जाळून निषेध केला. विशेष म्हणजे, धोटे तरुणपणी संघ स्वयंसेवक होते. जिल्ह्यतील भाजपच्या संघटनात्मक बांधणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. मात्र, संघ परिवाराशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी फारकत घेतली. गत 20 वर्षांपासून ते बहुजन चळवळीत काम करत आहेत.

loading image
go to top