Old Monk Tea : आता गोव्यात मिळतोय दारूपासून बनलेला चहा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Old Monk Tea

Old Monk Tea : आता गोव्यात मिळतोय दारूपासून बनलेला चहा

Old Monk Tea : तुम्ही तंदूर, मलई आणि मसाला चहा बद्दल ऐकले असेल. त्याचसोबत ग्रीन टी किंवा ब्लॅक टीही तूम्हाला आवडत असेल. चहाचा खूप मोठा फॅन फॉलोइंग आहे. भारतात बनवला जाणारा चहा तर आता परदेशातील लोकांचेही व्यसन बनले आहे.

असे असताना तूम्ही कधी दारू पासून बनलेला चहा पाहिला आहे का. होय, तुम्ही ते बरोबर ऐकले. गोव्यात प्रसिद्ध ओल्ड मोंक रमचा चहा बनवला जात असून त्याला ओल्ड मंक टी विथ कुल्हड असे म्हणतात. ओल्ड मंक चहा खास गोव्याच्या बीचवर बनवला जातो. आणि लोकांमध्ये तो खूप प्रसिद्ध होत आहे.

हेही वाचा: Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांची निदर्शने

गोव्यातील कँडोलिम येथील सिंक्वेरिम बीचवर तुम्ही ओल्ड मंक रम चहा पिऊ शकता. कुल्हडमध्ये चहा बनवण्यासाठी आधी ते गरम करून त्यात ओल्ड मोंक रम टाकली जाते. मग त्यात चहा घातला जातो. हा चहा कसा तयार होतो याचा एक एक व्हिडिओही आहे.

हेही वाचा: Rava Batata Puri Recipe : पुरी खायला आवडते? पण कधी रवा बटाटा पुरी ट्राय केली आहे का?

गोव्यात दारू स्वस्त मिळते त्यामूळे खास दारू पिण्यासाठी अनेक पर्यटक गोव्यात जातात. अशा या लोकांसाठी हा चहा म्हणजे पर्वणीच म्हणावी लागेल. ओल्‍ड मंक रम ही 1954 मधील इंडीयन डार्क रम आहे. ती 7 वर्षे जूनी असून तीला एक वेगळी व्हॅनिला चव आहे. त्यात अल्कोहोलचे प्रमाण 42.8 टक्के आहे. याचे उत्पादन उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे केले जाते.

हेही वाचा: Diabetes Patient Health Care: मधुमेहाच्या रुग्णांनी चप्पल बूट खरेदी करतानासुद्धा घ्यावी ही विशेष काळजी

अनेक वर्षांपासून बनतो दारूचा चहा

अनेक शतकांपासून दारू पासून बनलेला चहा पिला जातो. 17 व्या शतकापासून त्याचा प्रथम उल्लेख आहे. इंग्लिश मिल्क पंच हा सर्वात जुना दारू पासून बनलेला चहा आहे. तो बनवण्यासाठी दारू, चहा, पाणी, दूध, साखर आणि काही मसाले इत्यादींचा वापर केला जातो.