Old Pension Strike : संप मिटल्याने शिक्षकांना दिवसाला शेकडो उत्तर पत्रिका तपासणीचे टार्गेट

जुन्या पेन्शन योजनेसाठी मागील सात दिवसांपासून सुरू असलेला बेमुदत संप आज सरकारी कर्मचारी आणि शिक्षक संघटनानी मागे घेतल्याने पासून दहावी बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणीचे काम फास्टट्रॅकवर.
Answer Sheets cheaking
Answer Sheets cheakingsakal
Summary

जुन्या पेन्शन योजनेसाठी मागील सात दिवसांपासून सुरू असलेला बेमुदत संप आज सरकारी कर्मचारी आणि शिक्षक संघटनानी मागे घेतल्याने पासून दहावी बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणीचे काम फास्टट्रॅकवर.

मुंबई - जुन्या पेन्शन योजनेसाठी मागील सात दिवसांपासून सुरू असलेला बेमुदत संप आज सरकारी कर्मचारी आणि शिक्षक संघटनानी मागे घेतल्याने मंगळवारी, २१ मार्च पासून दहावी बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणीचे काम फास्टट्रॅकवर आणले जाणार आहे.

दुपारनंतर बेमुदत संप मागे घेतल्याचे जाहीर होताच अनेक शिक्षकांनी पेपर तपासणीला आजच सुरुवातही केली असल्याची माहिती शिक्षक संघटनाच्या प्रतिनिधींकडून देण्यात आली. तर दुसरीकडे मागील सात दिवसांपासून बंद असलेली शाळा, कनिष्ठ महाविद्यालये पुन्हा उद्यापासून सुरु होणार आहेत. तर मुंबईत कर्मचारी संपावर असल्याने ओस पडलेली शिक्षण निरीक्षक, शिक्षण उपसंचालक कार्यालयेही पूर्णपणे सुरू होणार आहेत.

मुंबईत शालेय शिक्षण विभागानचे सर्वात महत्त्वाचे असलेले शिक्षण उपसंचालक कार्यालय मागील सात दिवसांपासून पूर्णपणे बंद होते. त्यामुळे येथेही अनेक प्रशासकीय कामकाज ठप्प झाले आहे. अनेक प्रस्ताव, धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी रखडली आहे. त्यामुळे मंगळवारपासून सुरू होणाऱ्या शिक्षण विभागाच्या कार्यालयात पुढील काही दिवस मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

९० लाखाहून अधिक उत्तर पत्रिका तपासणीविना..

शिक्षक संघटनांनी मोठ्या प्रमाणात राज्यव्यापी संपात सहभाग घेतल्याने दहावीच्या विविध पेपरच्या ७० लाखाहून अधिक तर बारावीच्या २० लाखाहून अधिक उत्तर पत्रिका तपासणी वाचून पडून आहेत. त्या तातडीने तपासण्यासाठी शिक्षक कामाला लागणार आहेत, त्यासाठी सर्व काम वेळेत केले जाणार असल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे समन्वयक मुकुंद आंधळकर यांनी संगितले. तर दहावीच्या उत्तर पत्रिका तपासणीसाठी शिक्षक परिषदेच्या सर्व शिक्षक प्रतिनिधींना आजच सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी अधिक वेळ देऊन त्या तपासण्याची तयारी आमच्या शिक्षकांनी ठेवली असल्याचे शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी सांगितले.

Answer Sheets cheaking
Old Penstion Strike : संपाच्या स्थगितीमूळे सर्वसामान्यांचा सुटकेचा श्वास

देवदर्शन, गावी गेलेल्या शिक्षकांची अडचण

बेमुदत संप असल्याने अनेक शिक्षक शिर्डी, शेगाव, कोल्हापूर आदीसह राज्याबाहेर तिरुपती आदी ठिकाणच्या देवदर्शनासाठी तसेच आपल्या गावी गेले आहेत. मात्र आज संप मिटल्याने त्यांना तातडीने शाळांवर उपस्थित राहणे बंधनकारक होणार आहे. त्यामुळे देवदर्शनासाठी, गावी गेलेल्या शिक्षकांची अडचण होणार आहे. त्यांना मध्येच आपले हे देवदर्शन आणि गावाचा प्रवास सोडून आपल्या शाळांवर यावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com