
Kavita Raut Government Job: ऑलम्पिक धावपटू कविता राऊतची नोकरीची प्रतिक्षा आता संपणार आहे. कविता राऊत यांना लवकरच सरकारी नोकरी मिळणार आहे. तसेच त्या महाराष्ट्र सरकारच्या क्लासवन सेवेत लवकरच दाखल होणार असल्याचे समोर आले आहे. आदिवासी शिष्टमंडळाच्या बैठकीतील चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. कविता राऊत यांच्या नियुक्ती प्रोसेस अंतिम टप्प्यात आली आहे.