राज्यपालांच्या पदमुक्तीची चर्चा; राजभवनानं केला खुलासा : Bhagat Singh Koshyari | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhagat Singh Koshyari

Bhagat Singh Koshyari: राज्यपालांच्या पदमुक्तीची चर्चा; राजभवनानं केला खुलासा

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वारंवार केलेल्या वादग्रस्त विधानांमुळं यावेळी त्यांना जनतेच्या मोठ्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. दरम्यान, कोश्यारींनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. पण यावर आता राज्यपालांचं कार्यालय असलेल्या राजभवनातून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. (On discussion of Governor Bhagat Singh Koshyari resignation Raj Bhavan gives clarification)

हेही वाचा: Shraddha Murder Case : दिल्ली पोलिसांना मोठं यश! ज्यानं श्रद्धाच्या शरीराचे तुकडे केले ते हत्यार जप्त

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त निराधार आहे, राजभवनानं स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे. या स्पष्टीकरणामुळं राज्यपालांच्या राजीनाम्याच्या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे.

हेही वाचा: Rishikesh Deshmukh: अनिल देशमुखांचे पुत्र ऋषीकेश यांना मोठा दिलासा; कोर्टाकडून जामीन मंजूर

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल कोश्यारी यांनी नुकतंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात वादग्रस्त विधान केलं होतं. महाराजांबद्दल बोलताना ते आता जुने आदर्श झालेत आजचे आदर्श शरद पवार, नितीन गडकरी आहेत असं ते म्हणाले होते.

हेही वाचा - काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली?

यापार्श्वभूमीवर शिवसेनेचा ठाकरे गट आक्रमक झाला असून खुद्द उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या विधनाचा निषेध करत महाराष्ट्र बंदचा इशारा दिला आहे. तसेच शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांनी देखील तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देताना राज्यपालांना महाराष्ट्रातून पाठवून द्यावं अशी भूमिका मांडली आहे.