Devendra Fadanvis उपमुख्यमंत्री 5 दिवसांसाठी जपान दौऱ्यावर रवाना, मिळणार शासकीय अतिथीचा विशेष दर्जा

जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून देवेंद्र फडणवीस 5 दिवसांसाठी जपान दौर्‍यावर रवाना
Devendra Fadanvis
Devendra Fadanvis Esakal

जपान सरकारच्या निमंत्रणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ५ दिवसांच्या जपानला दौऱ्यावर आहेत, महाराष्ट्र आणि जपानच्या मैत्रीसंबंधांच्या दृष्टीने या दौऱ्यात प्रयत्न होणार आहे. त्याचबरोबर उद्योग, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील काही प्रकल्प, सामंजस्य करार आणि सहकार्य यासाठी हा दौरा महत्त्वाचा आहे. जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी (जायका) कडून मोठय़ा प्रमाणावर अर्थसहाय्य मिळवून विविध प्रकल्प मार्गी लावण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.

या दौऱ्यामध्ये पायाभूत सुविधा प्रकल्प, गुंतवणुकीला देणार चालना देण्यावर भर असणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जपानमधील अनेक वरिष्ठ मंत्र्यांचीही भेट घेणार आहेत. जायका, जेट्रो, जेरा यासारख्या अनेक गुंतवणूकदार तसेच जपान-इंडिया असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांचीही ते या दौऱ्यावेळी भेट घेणार आहेत.

Devendra Fadanvis
Chhagan Bhujbal: 'मी सरकारमध्ये म्हणून माझी भूमिका...', 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर भुजबळांचं स्पष्टीकरण

जायकाने राज्यातील अनेक प्रकल्पांना अर्थसहाय्य केले आहे. जपानमधील बुलेट ट्रेन आणि टोकियो मेट्रो ऑपरेशन्सला सुद्धा या दौर्‍यात ते भेटी देणार आहेत. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी 2015 मध्ये दौरा केला होता. जायकाने विविध प्रकल्पांसाठी महाराष्ट्रातील अनेक प्रकल्पांना वित्तपुरवठा केला होता. यात मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, बुलेट ट्रेन, मेट्रो-3, नागपूर नागनदी शुद्धीकरण अशा अनेक प्रकल्पांचा समावेश आहे.

Devendra Fadanvis
Supriya Sule: संजय राऊतांच्या 'त्या' टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'अजितदादांवर केलेल्या टीकेवर मला हसू...'

तर राज्यातून अनेक प्रकल्प गेल्याची टीका वारंवार विरोधक करत असतात. दरम्यान या दौऱ्यावेळी देवेंद्र फडणवीस अनेक गुंतवणूकदारांना ते भेटणार आहेत. या भेटींचा राज्याला काही प्रमाणात फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Devendra Fadanvis
Ajit Pawar: 'सत्तेची गदा आणि शरद पवार यांचे नाव नसेल तर अजित पवार कोण? असा प्रश्न...', सामनातून अजित पवारांवर टीका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com