Maharashtra Din: 'देखो आपला महाराष्ट्र' त्या पोस्टरवरून मंगलप्रभात लोढांची नेटकरी घेत आहेत शाळा

राज्याच्या पर्यटन विभागाकडून टूर पॅकेजवर नेटकरी संतापले
Mangal Prabhat Lodha
Mangal Prabhat Lodha Esakal

महाराष्ट्र राज्यातील पर्यटनाला चालना मिळावी या दृष्टीकोणातून तसेच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मार्फत १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत ‘देखो आपला महाराष्ट्र’ हे टूर पॅकेज सुरु करण्यात येत आहे. पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी याची आखणी केली आहे. मात्र या संकल्पनेवर सोशल मिडियावर टीकेची झोड उठताना दिसून येत आहे.

महाराष्ट्र पर्यटन विभागाने या संकल्पनेचे पोस्टर त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया साईटवरून पोस्ट केल्यानंतर त्यावरील 'देखो आपला महाराष्ट्र' हे वाक्य पाहून नेटकरी आपला संताप व्यक्त करताना दिसत आहेत. महाराष्ट्र दिनाच्या पूर्व संध्येला शासनाच्या जाहिरातीमध्ये अप्रगत राज्याची भाषा वापरली जाते लाज वाटली पाहिजे स्वतःला मराठी म्हणून घेतांना बघा आपला महाराष्ट्र अशा संतप्त भावना नेटकरी व्यक्त करत असून पोस्टरवरील 'देखो आपला महाराष्ट्र' या वाक्याच्या उल्लेखावरून आता नवीन वाद पेटण्याची शक्यता आहे

Mangal Prabhat Lodha
CJI Chandrachud : सरन्यायाधीशांच्या या निर्णयाने मने जिंकली! कायदा मंत्र्यांनी केलं चंद्रचूड यांचं कौतुक

महाराष्ट्र दिनाच्या पूर्व संध्येला राज्य सरकारद्वारे करण्यात आलेल्या या पोस्टरवरून पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यावर ही नेटकरी टिका करत आहेत."एका परप्रांतीयाला मराठी महाराष्ट्र राज्याचा पर्यटन मंत्री बनवल्यानंतर दूसरं काय पहायला मिळणार.ही तर सुरूवात आहे पुढे काय काय पहायला मिळेल याची तयारी ठेवा" अशा स्वरूपाच्या कमेंट या पोस्टवरती नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Mangal Prabhat Lodha
Pune Crime: पुणे हादरलं! नशा करणाऱ्यांना हटकल्याने कोयत्याने वार करत एकाची हत्या

टूर पॅकेजमध्ये काय आहे?

गड किल्ले, जागतिक वारसा स्थळे, साहसी पर्यटन, समुद्रकिनारे, जंगल सफारी, संग्रहालये, स्मारके, थंड हवेची ठिकाणे, एमटीडीसी सह असे आणि बरेच अनुभव घ्या, असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे.

1) भव्य महाराष्ट्र: महाराष्ट्र अँड क्वाड्रिलॅटरल टूर, ट्राइबल एक्सपीरिअन्स, रॉयल महाराष्ट्र, आणि अशाच अधिक सात सहली

2) आमची मुंबई: मुंबई देखो (तीन विविध सहली)

3) वाइल्डलाइफ विदर्भ: सेंटर ऑफ इंडिया नागपूर टूर्स,

4) टायगर टेल्स टूर, आउटडोअर म्युझियम टूर आणि पाच तत्सम टूर्स

5) मिस्टिकल अमरावती: ग्रेटर क्रेटर टूर मॅजिकल मेळघाट टूर

आणि दोन तत्सम सहली

6) हेरिटेज ऑफ छत्रपती संभाजीनगर: कैलास दी वर्ल्ड वंडर टूर,

7) एलोरा अजिंठा हेरिटेज टूर आणि अधिक आठ तत्सम सहली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com