Mon, October 2, 2023

मुंबई विमानतळावर 13 कोटींच्या अंमली पदार्थासह एकाला अटक
Published on : 3 September 2022, 9:16 am
मुंबई विमानतळावर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. अंमली पदार्थांचा मोठा साठा मुंबई विमानतळावर सापडला आहे. 13 कोटी रुपयांपेक्षाही जास्त किंमतीचे अंमली पदार्थ विमानतळावरुण जप्त करण्यात आले आहेत. अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. कोकेनचे एकूण 87 कॅप्सूल जप्त करण्यात आले आहेत.
मुंबई कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर ही कारवाई केली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची सध्या चौकशी सुरु आहे.
या घटनेनंतर मुंबई विमानतळावर चोख बंदोबस्त करण्यात आला असून आधिक तपास केला जात आहे. मोठ्या प्रमाणात आढळून येणाऱ्या अंमली पदार्थांमुळे अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून तपासही केला जात आहे.