जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी 100 दिवसांचे वाचन अभियान | Maharashtra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी 100 दिवसांचे वाचन अभियान
जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी 100 दिवसांचे वाचन अभियान

जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत 100 दिवसांचे वाचन अभियान

माळीनगर (सोलापूर) : भारत सरकारच्या (Government of India) शिक्षा मंत्रालयातर्फे (Ministry of Education) राज्य सरकारच्या (State Government) सहाय्याने बालवाटिका ते इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता जानेवारी ते एप्रिल 2022 या कालावधीत 100 दिवसांचे वाचन अभियान (Reading Campaign) राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेचे (Maharashtra State Council for Education and Research) संचालक एम. डी. सिंह (M. D. Singh)) यांनी ही माहिती दिली. (One Hundred Days Reading Campaign for Students from January to February)

हेही वाचा: पंजाब नॅशनल बॅंकेत चीफ टेक्‍निकल ऑफिसर पदांची भरती!

पायाभूत साक्षरता ही आजीवन शिक्षणाची एक आवश्‍यक पूर्वअट आहे. त्यासाठी वाचन सवय ही एक महत्त्वाची बाब आहे. म्हणून जिज्ञासू, कल्पक, उत्साही आणि सर्जनशील मुलांमध्ये वाचन सवयी विकसित होणे गरजेचे आहे. या अभियानांतर्गत आठवडानिहाय उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार उपक्रमाची आठवडानिहाय अंमलबजावणी करणे आवश्‍यक आहे.

वाचन आनंददायी पद्धतीने होण्यासाठी या उपक्रमाची साध्या, सहज व आनंददायी पद्धतीने रचना करण्यात आली आहे. या रचनांचे संचलन सुकर होण्याकरिता आवश्‍यक संदर्भ साहित्य, स्रोत हे शाळा, घर या स्तरावर सहज उपलब्ध होऊ शकेल अशा पद्धतीने देण्यात आले आहेत. तसेच शाळा बंद असण्याच्या स्थितीत करावयाच्या कृतीही देण्यात आल्या आहेत. आवश्‍यक बदलांबाबतही सूचित करण्यात आले आहे. तसेच या अभियानाच्या अनुषंगाने सहभागी घटकांच्या भूमिका व जबाबदारी या दृष्टीने मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: महाराष्ट्रात मेगाभरती! 25 विभागांमध्ये भरणार 15 हजार 511 पदे

मार्गदर्शक सूचना...

  • 100 दिवसांकरिता वाचन अभियानाची एक जानेवारीपासून सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये अंमलबजावणी करण्यात यावी

  • डाएटतर्फे या कार्यक्रमाच्या गुणवत्तेचे संनियंत्रण

  • अभियानातील विविध उपक्रमांचा अहवाल तयार करण्याच्या सूचना

  • या उपक्रमाचा सोशल मीडियावरील प्रसारासाठी #100 days Reading Campaign # Padhe Bharat हा हॅशटॅग वापरण्यात यावा

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top