
सोलापूर : गतवर्षी राज्य सरकारच्या ‘एक रुपयात पीकविमा’ योजनेमुळे राज्यातील एक कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी ११२ लाख हेक्टरवरील खरीप पिकांसाठी विमा भरला होता. योजनेमुळे शेतकऱ्यांना एक कोटी ७० लाख रुपये भरावे लागले होते. पण, आता ही योजना बंद केल्याने शेतकऱ्यांना यंदा पीकविम्यासाठी १,५०० कोटींहून अधिक रक्कम मोजावी लागेल, असे कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.