
धुळे : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून यामुळे अनेक ठिकाणी झाडे, वीज, घरं कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना धुळे जिल्ह्यात घडल्याचे समोर आले आहे. पावसामुळे मध्यरात्री गाढ झोपेत असताना एका कुटुंबावर छत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.