
तात्या लांडगे
सोलापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटल सध्या १२०० रुपये दर आहे. बाजार समितीत सरासरी ८० ते ८५ गाड्यांची आवक असून त्यातील ९५ टक्के कांदा जुनाच आहे. दरम्यान, खरीप व लेट खरीपात सोलापूर जिल्ह्यात यावर्षी एक लाख ३० हजार एकरवर कांदा लागवड होईल, असा अंदाज कृषी विभागाचा आहे. सध्या कांदा लागवडीची तयारी सुरू आहे.
सोलापूर बाजार समितीत सध्या नगर, भूम, परांडा, पुणे जिल्ह्यातून कांदा विक्रीसाठी येत आहे. ऑक्टोबरपासून सोलापूरचा कांदा बाजार समितीत येतो. तत्पूर्वी, ऑगस्टअखेर कर्नाटकातील (बागलकोट, विजयपूर) कांदा बाजारात येतो. सोलापूर जिल्ह्यात गतवर्षी खरीपात ९५ हजार एकरावर कांदा लागवड झाली होती. लेट खरीपात म्हणजेच सप्टेंबरनंतर ७३ हजार एकरावर कांदा लागवड झाली होती.
रब्बी हंगामात देखील सोलापूर जिल्ह्यात सुमारे ५० हजार एकरावर कांदा असतो. यंदाच्या पावसाळ्यात मे व जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला असून उजनी धरण देखील भरले आहे. त्यामुळे विहिरी, बोअरवेलची पाणीपातळी वाढल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मागील महिन्यात टाकलेले कांद्याचे रोप आता लागवडीयोग्य झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कांदा लागवडीसाठी जमिनीची मशागत करून ठेवली आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी खरीप व लेट खरीपात जिल्ह्यातील सुमारे सव्वालाख एकरावर कांदा लागवड होईल.
बाजार समितीतील कांद्याची स्थिती
सरासरी भाव
१००० ते १२०० रुपये
सर्वाधिक दर
१५०० ते १९०० रुपये
दररोजची आवक
८० ते ८२ गाड्या
‘या’ तालुक्यात सर्वाधिक कांदा लागवड
सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यात सर्वाधिक कांदा लागवड केली जाते. बार्शी तालुक्यात दरवर्षी लेट खरीपात पाच हजार हेक्टर कांदा लागवड होतो. याशिवाय उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ, माढा व करमाळा या पाच तालुक्यांमध्ये देखील कांदा मोठ्या प्रमाणावर असतो. सोलापूर जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यात सर्वाधिक कांदा लागवड होतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.