

Lasalgaon Onion Price
esakal
AI जनरेटेड सारांश, संपादकीय पडताळणीसह.
Onion Market Price : कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून बफर स्टॉकची विक्री, ‘कांदा एक्स्प्रेस’द्वारे प्रमुख शहरांकडे वाहतूक आणि साठेबाजांवर कारवाई अशा उपाययोजना सुरू असतानाच लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दराने पुन्हा उसळी घेतली आहे. अवघ्या दोन लिलाव सत्रांत सरासरी दरात सुमारे ६०० रुपयांची वाढ होऊन तो ४,४०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचला आहे. मंगळवारी (ता.२) कांद्याला कमाल ४,८६० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.