

Wedding and Upanayan Muhurats List
Esakal
नागपूर, ता. १२ : येत्या रविवारपासून (१७ मे) अधिक ज्येष्ठ मासारंभ म्हणजेच पुरुषोत्तम मास होत असून, तो १५ जून २०२६ पर्यंत आहे. त्यांनतर लगेचच चातुर्मास सुरू होत आहे. शिवाय या काळात विवाहासाठी महत्त्वाच्या असलेल्या गुरू-शुक्र या ग्रहांचे अस्त होत असल्याने पुढील वर्षी गुढीपाडवापर्यंत विवाहासाठी फक्त ३६ आणि उपनयनांसाठी १३ मुहूर्त असल्याचे प्रख्यात ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले.