'फिट इंडीया'मध्ये दोन लाखांपैकी फक्त ४३ हजार शाळांचीच नोंदणी, शेवटचे दोन दिवस शिल्लक

only 43 thousand school registered in fit india program in state
only 43 thousand school registered in fit india program in state

यवतमाळ : 'फिट इंडिया' मोहिमेअंतर्गत राज्यातील पहिली ते बारावीपर्यंच्या शाळांची नोंदणी ऑनलाइन पद्घतीने केली जात आहे. राज्यात एकूण एक लाख 99 हजार आठ शाळा असताना आतापर्यंत 43 हजार 76 शाळांनीच नोंदणीत सहभाग नोंदविला आहे. नोंदणीसाठी आता केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. या कालावधीत दीड लाख शाळांची नोंदणी करण्याचे आव्हान प्रशासनापुढे उभे ठाकले आहे.

पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्यासाठी केंद्र सरकारने फिट इंडिया ही मोहीम हाती घेतली आहे. सुदृढ आरोग्याचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांत जनजागृती करणे, शारीरिक क्षमता, मूल्यमापन चाचण्या राबविणे हा प्रमुख उद्देश आहे. एक महिनापासून शाळांची नोंदणी शासनाच्या संकेतस्थळावर करण्यात येत आहे. नोंदणीसाठी लिंक संबंधितांना पाठविण्यात आल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यात तीन हजार 347 शाळांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी एक हजार 979 शाळांची नोंदणी झाली आहे. उर्वरित एक हजार 368 शाळांची नोंदणी बाकी आहे. तर, राज्यात एक लाख 99 हजार शाळांपैकी केवळ 43 हजार 76 शाळांनीच नोंदणी केली. 27 डिसेंबर ही नोंदणीसाठी अंतिम मुदत आहे. त्यासाठी आता केवळ दोनच दिवस उरले आहेत. या काळात उर्वरित शाळांची नोंदणी करण्याचे आव्हान आहे. 'फिट इंडीया'ची नोंदणी जिल्हा क्रिडा कार्यालय, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या समन्वयातून करणे अपेक्षित होते. मात्र, शिक्षण विभागाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे क्रिडा कार्यालयाचे सूत्रांनी सांगितले.

शिक्षण विभाग व क्रिडा कार्यालयाकडून ऑनलाइन पद्घतीने नोंदणी केली जात आहे. या उपक्रमाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. शाळांच्या नोंदणीनंतर विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्यात येणार आहे. शिक्षण विभागाला पत्र देवून त्या पद्घतीने सूचना देण्यात आल्या आहेत.
-अब्दुल मुश्‍ताक, जिल्हा क्रिडा अधिकारी, यवतमाळ.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com