
Pahalgam terror attack: पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगामवर हल्ला केल्यानंतर भारताने पाकला चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला पाकिस्तानचं पाणी बंद करुन अनेक व्यवहार तोडले. त्यानंतर बुधवारी पहाटे पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची तळं भारतीय वायू सेनेने उद्ध्वस्त केली. गुरुवारी पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टीम भारताने नष्ट केल्या. पाकिस्तानच्या कुरापतींना अशा प्रकारे उत्तर देण्यास सुरुवात झाली आहे.