

सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा चुकीचा अर्थ काढत ओबीसीला २७ टक्के आरक्षण लागू असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा व्यक्त झाला आहे.
esakal
Opposition Blames Devendra Fadnavis : नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी पुढे ढकलण्यात आली आहे. २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी घेण्याचा निर्णय निवडणूक विभागाने घेतला होता. परंतु मतदान सुरू असतानाच अचानक उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावर विरोधी पक्षांनी टीका करण्यास सुरू केले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या निर्णयावर टीका करत निषेध व्यक्त केला आहे.