Ambadas Danve : मुंबई पोलिसांच्या मदतीने क्रिकेटमध्ये बेटिंग; विरोधी पक्षनेते दानवे यांचा आरोप
मुंबई - मुंबई पोलिस विभागातील मोठ्या अधिकाऱ्यांच्या मदतीने क्रिकेट स्पर्धांमध्ये मोठ्या प्रमाणात बेटिंग सुरू असल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी केला. संबंधितांच्या संभाषणाचा पेनड्राइव्ह त्यांनी सभापतींकडे दिला.
बेटिंग करणाऱ्यांमध्ये मेहुल जैन, कमलेश जैन आणि हिरेन जैन या व्यक्तींचा समावेश असून त्यांच्याकडून पाकिस्तानी खेळाडूंचा यासाठी वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेमध्ये ‘लोटस २४’ नावाच्या ॲपच्या माध्यमातून बेटिंग केल्यानंतर आता या सर्व व्यक्ती मुंबईत ‘आयपीएल’ साठी आल्याची माहिती दानवे यांनी अंतिम आठवडयावरील प्रस्तावावरील भाषणात सभागृहाला दिली.
‘महाराष्ट्रातील गुन्हेगारी’
राज्याच्या परिवहन, सिडको, महसूल, आरोग्य विभागातील गैरव्यवहार, मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप, अधिकाऱ्यांचे गैरव्यवहाराबद्दल भाष्य करीत व राज्यातील आर्थिक स्थिती रसातळाला जात असल्याचे सांगत सरकारच्या कार्यपद्धतीवर निषेध व्यक्त केला.
‘राज्याने गेल्या दोन वर्षांपासून ‘क्राईम इन महाराष्ट्र’ (महाराष्ट्रातील गुन्हेगारी) अहवाल प्रसिद्ध केलेला नाही. राज्यात ५६४ विविध गुन्हे दाखल झाले असून दंगलीच्या घटना घडल्या आहेत. नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये बलात्काराच्या घटनांचा आलेख वाढला असून दररोज २२ बलात्कार, ४५ विनयभंगाच्या घटना घडत आहेत. कायद्याचा धाक नसल्यामुळे या सर्व घटना घडत आहे. सरकारने सुरू केलेल्या ‘मिशन शक्ती’ मोहिमेत आतापर्यंत २२ टक्के रक्कम खर्च झाली असून ही दुर्दैवी बाब आहे,’ असे दानवे म्हणाले.
कारागृहाची बंदीची क्षमता २७ हजार ११४ बंदी असताना ४३ हजार बंदी कोंबून ठेवले आहेत. राज्यात ५१ हजार कोटी रुपयांची फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. राज्यात गुन्ह्यांचे व सायबर गुन्ह्याचे प्रमाण वाढले असून ते रोखण्यासाठी सायबर कक्ष प्रभावी होण्याची आवश्यकता दानवे यांनी व्यक्त केली.
दानवे यांचे आरोप
अभिनेता सैफ अली खान यांच्या घरात घुसून चोरी करून त्याला मारण्याचा प्रयत्न
बीड मस्साजोग सरपंच हत्येतील आरोपी अद्याप पकडला जात नाही
सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू मानव आयोगाच्या अहवालात पोलिसांनी केलेल्या मारहाणीत झाल्याचे स्पष्ट
मंत्र्यांचा परदेशात चाललेल्या मुलाच विमान वळविले जाते, परंतु सूर्यवंशीला मारहाण करणाऱ्या लोकांवर सरकार कारवाई करू शकत नाही
अहमदाबादमधील सुधीर कोठडिया नावाच्या व्यक्तीने दोन हजार कोटी रुपये डिजिटल पद्धतीने जमवून हवाला मार्फत ते विदेशात पाठवून गुंतवणूकदारांची फसवणूक
गुंतवणूकदारांच्या फसवणुकीवरून पराग अशोककुमार शहा यांनी तक्रार केली. याप्रकरणाची चौकशी करावी
बोरिवली येथील पालिकेच्या रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न
‘सिटी फ्लो’च्या बसमुळे सार्वजनिक वाहतुकीच्या बसवर बंधने येत असल्याने ‘सीटी फ्लो’च्या बस बंद कराव्यात
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
