
मुंबई: महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते विखे-पाटील यांचा राजीनामा अध्यक्षांनी स्वीकारला तर कालिदास कोळंबकर भाजप बरोबर काम करत आहेत, नितेश राणेही काँग्रेस बरोबर नाहीत आणि अब्दुल सत्तार यांची काँग्रेसने हकालपट्टी केली आहे, याचा अर्थ काँग्रेसचे संख्याबळ कमी झाले आहे, अशी वस्तुस्थिती असताना पुढील विरोधी पक्षनेता हा काँग्रेसचा न होता बहुधा राष्ट्रवादी काँग्रेसचा होईल, अशी शक्यता आज शिक्षण मंत्री तावडे यांनी व्यक्त केली.
तावडे पुढे म्हणाले की, विखे पाटील यांचा राजीनामा हा विधानसभा अध्यक्षांकडे दिला पाहीजे आणि तो विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारुन विधानसभेत त्याची घोषणा केली पाहीजे. तसेच, भाजप 27 एप्रिल रोजी मनसेच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश करणार असताना आता काँग्रेस का घाबरली आहे. मनसे व काँग्रेस एकत्र आहेत का असा थेट सवाल तावडे यांनी आज केला आहे.
भाजपने उद्या सभा घेतली तर आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी मिळणार नाही असा आक्षेप घेत कॉग्रेसचे मिलिंद देवरा यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. पण जर तुमचे खरे असेल तर मग घाबरता कशाला? तुम्ही खोटे बोलता म्हणून तुम्ही घाबरता. त्यामुळेच तुमच्या खोटारडेपणाचा आम्ही पर्दाफाश करणार आहोत असेही तावडे यांनी ठामपणे सांगितले.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मुंबईत एकही जागा मिळणार नाही व काँग्रेस सपाटुन मार खाणार आहे अशी चाहूल काँग्रेसला आधीच लागली आहे. महाराष्ट्रात राहुल गांधी यांची जाहिर सभा घेऊनही काँग्रेसचा पराभव होऊ शकेल अशी भिती काँग्रेसला वाटली असावी म्हणूनच राहुल गांधी यांची मुंबईत जाहिर सभा आणि रोड शो होणार नाही अशी शक्यता तावडे यांनी व्य़क्त केली आहे.
काँग्रेसने दोन महिन्यापूर्वी हुकुमाचा एक्का म्हणुन प्रियांका गांधी यांना राजकारणात उतरवले तसेच वाराणसी मतदार संघातून नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढविणार अशी हवा केली परंतु पराभवाची चाहूल लागताच काँग्रेसने आपला हुकुमी एक्का म्यान करुन टाकला अशी टिकाही तावडे यांनी केली.
राज ठाकरे सध्या खोटे बोलत आहेत. त्यांनी कालच्या सभेत दाखविलेला एक फोटो मुळात भाजपचा नाही, पी.एम. ऑफीसचा नाही, सी.एम. ऑफिसचा नाही, माझ्या ऑफीसचा नाही असे स्पष्ट करतानाच तावडे यांनी सांगितले की, मोदी यांनी फॉर्म भरताना अटलजींच्या अंत्ययात्रेची गर्दी दाखवली आहे असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे आणि हा फोटो समजा 2014 मधील असेल, तर 2014 मध्ये अटलजी यांचे निधन झाले होते का ? त्यामुळे राज ठाकरे खोटे बोलत आहे व जनतेला मूर्ख बनवित आहेत असा आरोपही त्यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.