नागपूर - ‘हिवाळी अधिवेशनात विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. राज्यघटनेनुसार विधान परिषद आणि विधानसभेत विरोधी पक्षनेता असणे आवश्यक आहे..मात्र, हे सरकार राज्यघटना आणि लोकशाहीसुद्धा मानत नसल्याने आम्ही सरकारच्या चहापानाला जायचे नाही असे ठरवले आहे,’ असे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आज पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केली. वडेट्टीवार म्हणाले, ‘राज्यात जेव्हा सध्या सत्तेत असलेल्या पक्षाचे १२ ते १४ आमदार होते, तेव्हाही तत्कालीन सरकारकडून विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले होते. ती राज्याची परंपरा होती. विशेष म्हणजे हे घटनात्मक पद आहे..मात्र, सरकारला राज्यघटनेचा विसर पडला आहे. सरकारला मनमानी कारभार करायचा असल्याने त्यांना विरोधकांची भीती वाटत आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ‘तारीख पे तारीख’ देण्यात येत आहे. राज्यात दररोज सहा ते सात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. महाराष्ट्रात आठ महिन्यांत तीन हजार ३८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. सरकारने कापसावरील आयातकर शून्य केला. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना भाव मिळत नाही.’वाढत्या गुन्हेगारीवरूनही वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले. ‘गुन्हेगारीत महाराष्ट्र अग्रेसर होत चालला आहे. ‘उडता पंजाब’ प्रमाणे आता ‘उडता महाराष्ट्र’ अशी राज्याची प्रतिमा होत आहे. महिला आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचार वाढले आहेत. शेतकऱ्यांसह आता कंत्राटदारही आत्महत्या करीत आहेत..दुसरीकडे, सरकारमधील त्यांचे सहकारीही शेतकऱ्यांना ‘फुकटे’ आणि ‘कर्जमाफी मागण्याचा धंदा’ सुरू केल्याची भाषा करतात. हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. राज्यावर कर्जाचा डोंगर वाढत आहे. या सरकारने सुरू केलेल्या अनेक योजनाही बंद पडल्या आहेत. केवळ लाडक्या बहिणी करायचे आणि त्यांच्यावरील अत्याचाराकडे दुर्लक्ष करायचे असाच सरकारचा कारभार आहे.आज राज्यात महिला, मुली सुरक्षित नाहीत. भ्रष्टाचार वाढला आहे. मंत्र्यांच्या नात्यातील एखाद्या कंत्राटदाराला कंत्राट देण्याचे काम सुरू आहे.’ गुंडांना पाठीशी घालण्याचे कामही सरकार करीत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव राज्य सरकारने उशिरा पाठविल्याचा आरोप त्यांनी केला..विरोधकांना सरकार घाबरते : भास्कर जाधवदोन्ही सभागृहांत विरोधी पक्षनेता नाही. तो असावा ही बाब केवळ परंपरेने आली नसून, ते घटनेत नमूद आहे. ज्या पक्षाचे सदस्य जास्त त्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद द्यावे. आपल्या मर्जीप्रमाणे कारभार करता यावा म्हणून हा घाट घातला जात आहे, असा आरोप आमदार भास्कर जाधव यांनी केला.जाधव म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांनी एक आमदार या नात्याने आम्हाला चहापानाचे वैयक्तिक निमंत्रण दिले. पत्रात महाराष्ट्राची गौरवशाली परंपरेचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, ही परंपराच तुडविण्याचे काम सत्ताधाऱ्यांमार्फत सुरू आहे. सभागृहात मंत्री उत्तर देत नाहीत. सर्वांची एकत्रित उत्तरे देऊन टाळाटाळ केली जाते.’.सत्तेत नसताना अनेकदा विदर्भाला न्याय देण्याची मागणी सध्या सरकारमध्ये असलेल्या पक्षाकडून होत होती. मात्र, आता केवळ एक आठवड्याचे अधिवेशन ठेवून त्यांच्याकडूनच नागपूर कराराला फाटा दिला जात आहे. विदर्भाला न्याय देण्यासाठी काहीही उपाययोजना सरकारकडे नाही.- अनिल देशमुखे, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष.विरोधकांचे आरोपशेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत गंभीरपणे काम नाही. कर्ज माफीची अंमलबजावणी नाहीपुणे शहर गुन्हेगारी राजधानी म्हणून नव्याने उदयास येत आहेमहायुतीतील पक्षांनी निवडणुका पैशांच्या जोरावर लढवल्यासरकारकडून संवादाला महत्त्व नाही.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.