Ajit Pawar : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; विरोधकांनी गैरसमज पसरवू नयेत

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह राज्य सरकारने सुरू केलेली कोणतीही योजना बंद होणार नाही.
Ajit pawar
Ajit pawarsakal
Updated on

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह राज्य सरकारने सुरू केलेली कोणतीही योजना बंद होणार नाही, मात्र तत्कालीन परिस्थितीनुसार सुरू केलेल्या काही योजना या त्यांच्या फेरआढाव्यानंतर कालबाह्य ठरल्याने बंद कराव्या लागतात.

त्यामुळे कोणताही गैरसमज समाजात पसरेल अशा पद्धतीने विरोधकांनी वागू नये,’ असे सांगत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेचा समारोप करताना विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

राज्याचे आर्थिक आरोग्य चांगले असल्याचे सांगतानाच त्यांनी राज्याची अर्थव्यवस्था चिंताजनक असल्याचा चुकीचा संदेश जाऊ नये, याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे असा सल्लाही दिला. उत्पन्न वाढीसाठी आणि तूट कमी करण्यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवण्याबरोबरच कठोर उपाययोजना करणार असल्याचे सूतोवाच त्यांनी यावेळी केले.

मुद्रांक व नोंदणी फी, राज्य उत्पादन शुल्क, राज्य वस्तू व सेवा कर यात ५ ते १९ हजार कोटी रुपयांची वाढ अपेक्षित असल्याने येत्या वर्षाअखेरपर्यंत याहीपेक्षा मोठी वाढ होऊन तूट कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पवार यांनी विरोधकांचा समाचार घेतला. विधिमंडळातील ७५ सदस्यांनी या चर्चेत भाग घेऊन शंका उपस्थित केल्या होत्या. त्याला त्यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले. या अर्थसंकल्पात मागील वर्षीच्या काही योजना बंद केल्याचा उल्लेख काही सदस्यांनी केला. त्याला उत्तर देताना काही योजना ह्या त्या त्या वेळी उद्भवलेल्या परिस्थितीनुसार सुरू केल्या जातात. सर्वच योजनांचा वेळोवेळी फेरआढावा घेतला जातो, असेही स्पष्ट केले.

‘राष्ट्रवादी’कडून खोडके, शिवसेनेकडून रघुवंशी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ज्येष्ठ नेते संजय खोडके यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केली असून खोडके यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी खोडके यांच्या नावाची घोषणा केली. शिवसेनेकडून नंदूरबार येथील चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

शिक्षक आत्महत्या; गुन्हा दाखल होणार

बीड जिल्ह्यातील शिक्षक धनंजय नागरगोजे यांच्या आत्महत्या प्रकरणाचे आज विधानपरिषदेत तीव्र पडसाद उमटले. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावरून राज्य सरकारला धारेवर धरले. तसेच, याप्रकरणी अद्यापही संस्थाचालकांवर गुन्हा का दाखल केला नाही, असा जाब दानवे यांनी विचारला; यावर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सखोल चौकशी करून गुन्हा दाखल होईल, असे उत्तर दिले.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले,

  • दळणवळण व्यवस्थांकडे सरकारचे लक्ष

  • रस्त्यांच्या बांधणीसाठी अधिक निधी दिला

  • शेतीमध्ये ‘एआय’च्या वापरास प्रोत्साहन

  • राज्यात ४५ लाख कृषीपंपांना मोफत वीज

  • कोरोनात कृषी क्षेत्राने राज्याला तारले होते

  • कृषीसाठी ९ हजार ७०० कोटींची तरतूद

  • पाच वर्षांत ४० लाख कोटीची गुंतवणूक होणार

  • राज्याची अर्थव्यवस्था वन ट्रिलियन डॉलर होईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com