मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने सुरुच ठेवली असली तरी लाडक्या बहिणींची १५०० रुपयांवरच बोळवण सरकारने केली आहे. विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींना २१०० रुपये दिले जाणार असल्याच्या आश्वासनाला महायुती सरकारने वाटाण्याच्या अक्षता लावल्याचा आरोप करत विरोधकांनी महायुतीला लक्ष्य केले आहे. नऊ महिन्यांपूर्वी ही योजना जाहीर झाली त्यावेळी ४६ हजार कोटींच्या या योजनेला आता कात्री लावण्यात आली असून २०२५-२०२६ साठी ३६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.