

solapur traffic police
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर शहरातील वाहतूक कोंडी व अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी वाहतूक अंमलदार नेमले आहेत. दररोज वाहतूक पोलिसांना ड्युटी देण्यात आली आहे. त्यांनी नेमून दिलेल्या ठिकाणीच असणे बंधनकारक आहे, असे पोलिस उपायुक्त वृष्टी जैन यांनी सांगितले.
सोलापूर शहराच्या हद्दीत सर्वाधिक अपघात होणारी १८ ठिकाणे (ब्लॅकस्पॉट) आहेत. या ठिकाणी कोणत्या वेळी व कोणत्या दिवशी सर्वाधिक अपघात झाले आहेत, त्याची नेमकी कारणे काय, याचा अभ्यास सुरू आहे. त्यानुसार त्या ठिकाणी उपाययोजना केल्या जाणार आहेत, जेणेकरून अपघातात कोणालाही जीव गमवावा लागणार नाही. त्यासंदर्भात आयआयटी मद्रास येथील टीमकडून प्रशिक्षण आयोजित केल्याचेही वृष्टी जैन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मागील वर्षी जून महिन्यात नऊ गंभीर अपघातांत नऊ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, यंदा अपघात व अपघाती मृत्यू चारने कमी झाले आहेत. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईसाठी आता स्पीड डिटेक्शन कॅमेरे बसविणार आहोत. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे निधी मागितल्याचेही त्या म्हणाल्या.
वाहनचालकांनी नियम पाळावेत म्हणून आम्ही प्रबोधन करणार
मागील वर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत यावर्षी जूनमध्ये अपघात कमी झाले आहेत. मात्र, अपघातात कोणालाही जीव गमवावा लागू नये, यासाठी आम्ही आयआयटी मद्रास येथील टीमच्या माध्यमातून प्रशिक्षण वर्ग आयोजित केला आहे. शहरातील १८ अपघातप्रवण ठिकाणांची पाहणी करून त्या ठिकाणी ठोस उपाययोजना केल्या जातील. आमच्या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांसाठी आम्ही हेल्मेट बंधनकारक केले असून, अन्य दुचाकीस्वारांनीदेखील स्वतःच्या सुरक्षेसाठी हेल्मेटचा वापर करावा. त्यासाठीही आम्ही प्रबोधन करणार आहोत.
- वृष्टी जैन, पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर
रिक्षा चालकांना ड्रेसकोडचे बंधन; स्टॅण्डची जागा वाढवून मागितली
सध्या शहरात रिक्षांमधून मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक प्रवासी वाहतूक होत आहे. प्रत्येक रिक्षा चालकासाठी ड्रेसकोड बंधनकारक असल्याचे सांगितले आहे. काही ठिकाणी रिक्षा स्टॅण्डसाठी जागा अपुरी पडत आहे. त्या ठिकाणी जागा वाढवून देण्यासंदर्भात महापालिकेकडे पत्रव्यवहार केल्याचेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.