
Health Lifestyle: 'हेल्दी लाइफस्टाइल'चा विचार केला की, 'सेंद्रिय अन्न' हे नाव सर्वात आधी घेतले जाते. मोठमोठ्या सुपरमार्केटपासून स्थानिक बाजारापर्यंत लोक हेच विचार करून सेंद्रिय फळे आणि भाज्या विकत घेतात की, ते अधिक पौष्टिक, सुरक्षित आणि आरोग्यासाठी उत्तम आहेत. सोशल मीडियावरही अनेकदा असा दावा केला जातो की, सेंद्रिय आहारामुळे शरीर निरोगी राहते आणि आजार दूर राहतात. पण, प्रश्न असा आहे की, सेंद्रिय अन्न खरोखरच सामान्य पद्धतीने पिकवलेल्या फळे आणि भाज्यांपेक्षा अधिक आरोग्यदायी असते का? यावर काही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे की, सेंद्रिय आणि सामान्य अन्नातील फरक पोषणमूल्यांचा नसून कीटकनाशकांचा आहे.