Sharad Pawar : तुमच्या शहाणपणाची चर्चा न्यूयॉर्कमध्ये;शरद पवार,बारामतीत व्यापारी परिसंवाद मेळाव्याचे आयोजन

‘‘लोकसभा निवडणुकीदरम्यान अनेक गोष्टी माझ्या कानावर येत होत्या. परंतु, मी शांत होतो. मला माहिती होते की, बारामतीकर सुज्ञ आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघांत १२५० बूथ आहेत. त्यापैकी आपल्याला ११९० बूथवर मताधिक्य मिळाले.
Sharad Pawar
Sharad Pawarsakal

काटेवाडी : ‘‘लोकसभा निवडणुकीदरम्यान अनेक गोष्टी माझ्या कानावर येत होत्या. परंतु, मी शांत होतो. मला माहिती होते की, बारामतीकर सुज्ञ आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघांत १२५० बूथ आहेत. त्यापैकी आपल्याला ११९० बूथवर मताधिक्य मिळाले. हा तुमचा शहाणपणा आहे. तुमच्या या शहाणपणाची चर्चा न्यूयॉर्कमध्ये होत होती. तुम्ही साधी लोकं आहात का?’’ असा मिस्कील सवाल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला. दरम्यान, ज्यांनी आम्हाला मदत केली, त्यांचा मी आभारी आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

बारामतीतील महावीर भवनात मंगळवारी (ता. ११) व्यापारी महासंघ बारामती, बारामती मर्चंट असोसिएशन व स्वाभिमानी व्यापारी महासंघ बारामती यांच्यावतीने व्यापारी परिसंवाद मेळावा झाला. यावेळी शरद पवार बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री मदन बाफना, संभाजी किर्वे, सुशील सोमानी, नरेंद्र गुजराती, वालचंद संचेती यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी विठ्ठल मणियार, पोपट ओसवाल, युगेंद्र पवार, राजेंद्र गुगळे, सदाशिव सातव, जवाहर वाघोलीकर, सतीश खोमणे, एस. एन. जगताप आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘आम्हाला वाटले की राम मंदिर झाल्यामुळे मतदान सत्ताधाऱ्यांकडे जाईल. मात्र, मतदारांच्या सामूहिक शहाणपणामुळे देशाची लोकशाही टिकली. ज्या सत्ताधाऱ्यांनी टोकाची भूमिका घेतली, त्यांनी जमिनीवर पाय ठेवून काम केले पाहिजे. हे लोकांनी दाखवून दिले. मोदींना सरकार बनविताना इतरांची मदत घ्यावी लागली. इतरांची मदत घ्यावी लागते, तेव्हा सरकार स्थिर असावे, अशी अपेक्षा असते. स्थिर सरकारच मजबूत अर्थव्यवस्था देऊ शकते. अर्थव्यवस्था मजबूत झाली तर व्यापार वाढतो.’’ सुधीर पाटसकर यांनी प्रास्ताविक केले.

बारामती, जेजुरी, इंदापूर, भिगवण, चाकण, रांजणगाव, शिरवळ व हिंजवडी या ठिकाणी अनेक मोठे उद्योग आणले आहेत. पुढील काळामध्ये या भागांत अजून उद्योग मला आणायचे आहेत. त्यासाठी तुमची व सत्ताधाऱ्यांची मदत घ्यावी लागणार आहे.

- शरद पवार, ज्येष्ठ नेते

युगेंद्र पवार यांच्यासाठी उमेदवारीची मागणी

बारामती विधानसभेच्या आगामी निवडणूकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता. ६) ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे केली. लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच पवार हे गोविंदबाग येथील निवासस्थानी आले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी ही मागणी केली. ‘‘तुमच्या भावना मला समजल्या. योग्य तो निर्णय कळवू,’’ असे बोलून पवार यांनी त्यांना समाधानी करण्याचा प्रयत्न केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com