उद्धव ठाकरे म्हणतात, 'मुख्यमंत्रिपदापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे'

वृत्तसंस्था
रविवार, 23 जून 2019

अन्नदाता राहिला पाहिजे सुखी

- तुम्ही सर्व लोक शिवसेनेची ताकद आहात.

अहमदनगर : मुख्यमंत्रिपदावर कोण असेल, या प्रश्नापेक्षा मला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणे महत्त्वाचे वाटते. त्यासाठी माझे प्राधान्य आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (रविवार) स्पष्ट केले. तसेच शेतकऱ्यांच्या मनातील चीड उफाळून आल्यास सत्तेची आसने खाक होतील, असेही ते म्हणाले. 

श्रीरामपूर येथे पीक विमा केंद्राच्या उद्घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची शिवसेनेची भूमिका आहे. तालुक्यात प्रत्येक ठिकाणी पीक विमा केंद्र सुरू करायला हवे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन त्याबाबत शेतकऱ्यांना माहिती देणे गरजेचे आहे. शिवसेनेकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढा देण्याची भूमिका नेहमीच राहिलेली आहे.

अन्नदाता राहिला पाहिजे सुखी

अन्नदाता सुखी राहिला पाहिजे, अशी आमची इच्छा आहे. त्याचा बळी देण्याचे पाप आपण कधीही करणार नाही. तुम्ही सर्व लोक शिवसेनेची ताकद आहात.

कर्जमाफीचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळाला?

यावेळी उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी व पीक विम्याचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळाला, असा प्रश्न उपस्थित शेतकऱ्यांना केला होता. त्यावर बोटावर मोजण्याइतक्याच लोकांनी हातवर केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Our Importance to Farmers Issue not CM Post says Uddhav Thackeray