Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आमचाच पुढाकार; विरोधकांचा दावा

टीम ई-सकाळ
गुरुवार, 27 जून 2019

- मराठा आरक्षणासाठी आम्ही टाकली होती पावले.

- आमचाच होता पुढाकार.

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणाच्या विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज (गुरुवार) फेटाळल्या. त्यानंतर मराठा आरक्षणासाठी आम्ही पावले टाकली होती. त्यासाठी आमचाच पुढाकार होता, असा दावा विरोधकांनी केला. 

मराठा समाजाला राज्यात शिक्षणामध्ये 12 तर शासकीय नोकर्‍यांमध्ये 13 टक्के आरक्षण मिळणार आहे, यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. या निर्णयावर समाधान व्यक्त करत विरोधकांकडून दावा केला जात आहे. त्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आम्ही पावले टाकली होती. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमचाच पुढाकार होता. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे जे काही शक्य झाले नाही. मात्र, आता ते प्रत्यक्षात आले.

दरम्यान, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जावे ही भावना होती. ती मान्य केली गेली. त्यामुळे मी आनंद व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Our initiative for Maratha reservation says Opposition Leaders