esakal | राज्यातील कारागृहांत क्षमतेपेक्षा जास्त कैदी
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यातील कारागृहांत क्षमतेपेक्षा जास्त कैदी

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीमुळे कमी शिक्षा असलेल्या कैद्यांची मुक्तता करण्यात आली आहे. मात्र, राज्यातील कारागृहे ‘ओव्हर फ्लो’च आहेत. मध्यवर्ती कारागृहे व जिल्हा कारागृहांमध्ये दुपटीपेक्षा अधिक कैदीसंख्या आहे. यामध्ये ७५ टक्के न्यायाधीन (कच्चे), तर २५ टक्के सिद्धदोष (शिक्षा सुनावलेले) कैदी आहेत.

राज्यातील कारागृहांत क्षमतेपेक्षा जास्त कैदी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीमुळे कमी शिक्षा असलेल्या कैद्यांची मुक्तता करण्यात आली आहे. मात्र, राज्यातील कारागृहे ‘ओव्हर फ्लो’च आहेत. मध्यवर्ती कारागृहे व जिल्हा कारागृहांमध्ये दुपटीपेक्षा अधिक कैदीसंख्या आहे. यामध्ये ७५ टक्के न्यायाधीन (कच्चे), तर २५ टक्के सिद्धदोष (शिक्षा सुनावलेले) कैदी आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यातील ६० कारागृहांपैकी १९ खुली कारागृहांसह मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद आणि नागपूर अशा शहरात मध्यवर्ती तर २८ जिल्ह्यात जिल्हा कारागृह आहेत. विशेष, किशोर सुधारालय, महिला कारागृह आणि खुली वसाहत हे प्रत्येकी एक आहे. मध्यवर्तीसह जिल्हा कारागृहात दुप्पटीपेक्षा अधिक कैदी संख्या झाली आहे.

शाळा सुरू करण्यासाठी लगबग; शाळांचे सॅनिटायझेशन 

राज्यातील साठ कारागृहातील कैद्यांची अधिकृत कैद्यांची संख्या २४ हजार आहे. प्रत्यक्ष कैदीसंख्या ३० हजार ३०६ आहे. यामध्ये सिद्धदोष कैद्यांची संख्या पाच हजार ३१९ व न्यायाधीन कैद्यांची संख्या २३ हजार ५५८ आहे. १०३ कैदी स्थानबद्ध आहेत.

Edited By - Prashant Patil

loading image