
अहमदनगर (अहिल्यानगर) येथे एमआयएमच्या सभेत असदुद्दीन ओवैसी यांनी भाषण केले.
सभेत एका बुरखेवाली महिलेने मंचावर येऊन ‘जय भीम, जय शिवराय’ अशी घोषणा दिली.
त्या घोषणेमुळे सभेत उपस्थित आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला.
एमआयएम पक्षाचा पक्षाचा मेळावा गुरुवारी अहिल्यानगरमध्ये मेळावा पार पडला, खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी यावेळी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट भिरकावल्याचा प्रकाराचा समाचार घेतला. एक दलित व्यक्ती देशाच्या सरन्यायाधीशपदी बसतो आणि त्याचाच राग धर्मांध लोकांना आहे. असं ओवैसी म्हणाले, मात्र या मेळाव्यात ओवैसी यांच्यानंतर आणखी एका एका महिलेच्या भाषणाची चांगलीच चर्चा रंगली. महिलेने मंचावर येताच 'जय भीम- जय शिवराय'ची अशी घोषणा दिली, आणि याचे कारणही सांगितले.