
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यात आलाय. या भ्याड हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा समावेश आहे तर काही जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहलगाममधील हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू झाला असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. तिथल्या प्रशासनाकडून जखमींना आणि तिथं असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मदत केली जात असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली.