Mungi Bhosale Descendants : छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे याचं इंदापूरच्या युद्धात अकाली निधन झालं. त्यानंतर शहाजीराजेंची म्हणजे शिवरायांच्या वडिलांची संपूर्ण जबाबदारी मालोजीराजेंचे बधू विठोजीराजे यांनी घेतली होती. त्यांनी शहाजीराजेंना घडवलं. याच विठोजी राजेंच्या एका मुलाने पैठणमधील मुंगी येथे मोठा वाडा बांधला. हा वाडा आता भूईसपाट झाला आहे. मात्र, छत्रपतींचे वारसदार आजही याठिकाणी बघायला मिळतात.